धान खरेदीची मर्यादा वाढवून दिल्याने देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा
राज्याला १६ लाख क्विंटल धान खरेदीची परवानगी
देवरी :केंन्द्र सरकारने यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीला मर्यादा लावली होती. त्यामुळे गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले होते. धान खरेदीची मर्यादा वाढवून खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केंद्र मंत्री गोयल यांची भेट घेऊन केली होती. त्यानंतर केंद्रीय अन्न व नागरिक पुरवठा विभागाने राज्य सरकारला १६ लाख क्विंटल धान खरेदी करण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.