नगर पंचायत स्वच्छ सर्वेक्षणात व्यस्त, शिक्षक कॉलनीवासी नाल्यांपासून त्रस्त

तात्काळ नाली दुरुस्त करा, लोकांच्या जिवाशी खेळू नका- राजेश चांदेवार

देवरी 21:
नगरपंचायत देवरी स्वच्छ सर्वेक्षणात व्यस्त असतांना देवरी येथील शिक्षक कॉलोनीचे नागरिक जीव घेण्या नाल्या पासून त्रस्त झाल्याचे दिसत आहे.

सविस्तर वृत्त असे की देवरी येथील शिक्षक कॉलनी मध्ये शिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि इतर लोक वास्तव करतात त्यामुळे या कॉलोनी मध्ये शासकीय आणि खाजगी वाहनांची येजा सुरू असते परंतु तिसऱ्या गल्ली च्या सुरवातीला मुलतानी आणि श्रीपात्रे यांच्या घराच्या मध्ये रस्त्यात अपूर्ण बांधकाम केलेली नाली जीव घेणी ठरणार असे म्हणने चुकीचे ठरणार नाही.

सदर नाली रस्त्यावर असून झाकलेली नसल्यामुळे दररोज फेरीवाले , सायकलीनी जाणारे मुले आणि वाहन चक्क नालीत जातात त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून रात्री बेरात्री जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही.

सदर नाली दुरुस्त करण्याची मागणी शिक्षक कॉलनीतील रहिवासी राजेश चांदेवार, दीपक कापसे, जोतिबा धरमसहारे सह इतर नागरिकांनी केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share