अखेर ! वनहक्क जमिनीवरिल धान खरेदी करण्यात मंजूरी

देवरी, ता.२०; महाराष्ट्र शासनाच्या पारित निर्णयावरुन अखेर! वनहक्क जमिनीवरिल शेतकऱ्यांच्या धानाला खरेदी करन्यास मंजूरी मिळाली असून या बाबत गोंदिया चे जिल्हाधिकारी यांनी शुक्रवारी (ता.१८ डिसेम्बर) रोजी जिल्हा पणन अधिकारी, प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ भंडारा, आणि एन.ई.एम.एल.चे जिल्हा प्रतिनिधि यांना शासन निर्णयानुसार आता जिल्ह्यात ही धान खरेदी करणाऱ्या सर्व एजंसीन्ना वनहक्क जमिनीचे सात बारा नसलेल्या शेतकऱ्यांचे ही धान खरेदी करण्या बाबदचे आदेश दिले आहे. शेवटी आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी शेतकऱ्यांच्या सदर मागनीला धरून शासन स्तरावर सतत पाठपुरावा व प्रयत्न केल्याने या प्रकरणात यश मिळाले आहे.


जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला दिलेल्या आदेशात शासन निर्णयानुसार वनहक्क अधिनीयम २००५ अन्वये वनामधील जमीनी शेतकऱ्यांना दिलेल्या जमिनीचे नमूना ८-अ. प्रमाणपत्र मिळत नसल्याने अशा शेतकऱ्यांकडून नमूना ८-अ ऐवजी ज्या शेतकऱ्यांचे वनहक्क अधिनीयम २००५ नुसार वनामधिल त्यांच्या जमिनीचे धारण क्षेत्रनिश्चित करण्यात आलेल्या शासकीय कागदपत्राच्या आधारे जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केन्द्रावर धान खरेदी करण्यात यावे अशी तरतूद करण्यात आली आहे.
या निर्णयानुसार धान खरेदी करणाऱ्या एजंसीन्नी अशा शेतकऱ्यांचे धान खरेदी ऑनलाइन करन्याकरिता ऑनलाइन पोर्टलवर तशी तरतूद करण्याकरिता जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून या कार्यालयास प्राप्त झालेल्या वनहक्क पट्टाधारकांची सॉफ्ट कॉपी मधील याद्या नुसार पुढील योग्य करावी अशी सूचना ही दिल्या आहेत.


शेवटी आमदार सहषराम कोरोटे यांनी शेतकऱ्यांच्या या मागनीला धरून शासन स्तरावर सतत पाठपुरावा व प्रयत्न केल्याने या प्रकरणात यश मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील वनहक्क जमीनिच्या शेतकऱ्यांनी आमदार कोरोटे यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहे.

Share