गोंदिया-औरंगाबाद विमानसेवा लवकरच
गोंदिया: फ्लायबिची विमानसेवा जिल्ह्यातील बिरसी विमानतळावरुन सुरु इंदोर ते हैदराबाद ही विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता गोंदिया शहर औरंगाबादशी जोडले जाणार असून गोंदिया ते औरंगाबाद ही विमानसेवा लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने उड्डाण सेवेतंर्गत प्रायोगिक तत्वावर फ्लायबि कंपनीसोबत 6 महिन्याचा करार केला आहे. त्यामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर बिरसी विमानतळावरुन विमानसेवा सुरु झाली आहे. यातंर्गत मागील 13 मार्च रोजी फ्लायबिगची विमानसेवा बिरसी विमानतळावरुन सुरु झाली असून इंदोर, गोंदिया मार्गे हैदराबाद अशी नियमीत विमानसेवा सुरु आहे. गोंदियासह नजीकच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील प्रवाशीही मोठ्या संख्येने या विमानसेवेचा लाभ घेत आहे. विशेष म्हणजे, विमान प्रवासी भाड्यात कपात केल्याने सर्वसामान्य वर्गातील नागरिकही विमानसेवेचा आनंद घेताना दिसत आहे. आता फ्लायबिग एअरलाईन्सने आपल्या कंपनीचा विस्तार करुन गोंदियाला औरंगाबाद शहराशी जोडले आहे. यामध्ये औरंगाबाद-हैदराबाद व्हाया गोंदिया वनस्टॉप विमानसेवेचा समावेश आहे.
रात्रीचा मुक्काम हैदराबादला
फ्लायबिगतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गोंदियाहून औरंगाबादला जाण्यासाठी सध्या विमानाने गोंदियाहून हैदराबादला जावे लागणार आहे. तर रात्री हैदराबादला थांबून दुसर्या दिवशी सकाळी औरंगाबादसाठी विमानसेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे गोंदियावरुन औरंगाबादला प्रवास करणार्या प्रवाशांना रात्रीचा मुक्काम हैदराबादमध्ये करावा लागणार आहे.