नाल्यात वाहून गेलेल्या चौघांचेही मृतदेह मिळाले

गोंदिया: लोधीटोला व गौतमनगर येथील नाल्यातून वाहून गेलेल्या चौघाचेही मृतदेह आपत्ती निवारण विभागाच्या शोधपथकाने आज गुरुवारी 14 जुलै रोजी शोधून काढले. लोधीटोला नाल्यात वाहून गेलेला आशिष धर्मराज बागडे (23) व संजू प्रमोद बागडे (25) रा. पुजारीटोला तसेच गौतम नगर येथील चौथा नाल्यात वाहून गेलेले जावेद अली हजरत अली सय्यद (24) बाबा उर्फ रेहान कलीम शेख (15) रा. गौतमनगर अशी मृत युवकांची नावे आहेत.

या मृतदेहांचा शोध दोन पथकाद्वारे घेण्यात आला. यात पहिल्या पथकात नरेश उईके, राजकुमार खोटेले, जसवंत रहांगडाले, रविंद्र भांडारकर, संदीप कराडे, दिनू दिप, राजाराम गायकवाड, महेंद्र ताजने, दुर्गप्रसाद गगंगापारी, (चालक) मंगेश डोये, गृहरक्षक इंद्रकुमार बिसेन, चुन्नीलाल मुटकुरे, चिंतामण गिर्‍हेपुंजे, गिरधारी पतैह, जबराम चिखलोंढे यांचा तर दुसर्‍या पथकात अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, छबीलाल पटले, जितेंद्र गौर, महेंद्र बाने, सत्यम बिसेन, शहबाज सय्यद, राजेंद्र पटले, मुकेश ढाकेर, सुमित बिसेन, राहुल नागपुरे, आमिर खान, दुर्गेश तेलासे, अजय रहांगडाले, अंश चौरसिया, शुभम दास, मनीष रहांगडाले, शुभम ढेकवार, मुकेश माने यांचा समावेश आहे.

Print Friendly, PDF & Email
Share