मोठ्या पदव्या मिळवण्यापेक्षा प्रथम चांगले माणूस बना: जि.प.सदस्य उषाताई शहारे

■ देवरी येथे जि.प.हायस्कुलच्या सभागृहात नवोदय करिता निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम

देवरी, ता.१३: देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कुल मधील नऊ विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांची नवेगावबांध च्या नवोदय विद्यालय करिता निवड झाली. तेथे जाणारे विद्यार्थी हे निश्चितच उच्चअधिकारी बनतातच. यात कुणी इंजिनियर, डॉक्टर अथवा मोठे मोठे पदव्या मिळवितील. परंतु मोठ्या पदव्या मिळविण्यापेक्षा प्रथम तुम्ही चांगले माणूस बना. जर तुम्ही चांगले माणूस बनून चांगले गुण अंगी कारले तर समाज घडविण्यामध्ये तुमचा मौलाचा वाटा राहणार आहे असे प्रतिपादन गोंदिया जिल्ह्यातील ककोडी क्षेत्राचे जि.प.सदस्य उषाताई शहारे यांनी केले.
उषाताई शहारे ह्या देवरी येथे जि.प.हायस्कुल च्या सभागृहात मंगळवार(ता.१२ जुलै) रोजी आयोजित नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांनी बोलत होते.
या प्रसंगी शाळेचे मुख्यध्यापक एम.के.सयाम, अर्जुनी मोरगाव नगरपंचायत चे नगरसेविका शिलाताई उईके, सहाय्यक शिक्षक आशिष वाघदेवे, के.एच.चोपकर, डी,व्ही.टेटे, एल.एस.लांजेवार, तासिका शिक्षिका निशा लांजेवार, रिया धारगावे, अनिता फुन्ने, मंदा ठवरे यांच्या सह शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
दरम्यान पुढे बोलतांनी उषाताई शहारे ह्या म्हणाल्या की, मी या शाळेची माजी विध्यार्थ्यांनी आहे. व्यक्ती हा वयाने किती ही मोठा झाला तरी तो आपला बालपण कधीच विसरू शकत नाही. मी आज एक लोकप्रतिनिधी आहे. जेव्हा मी पं.स.ची सभापती होती तेव्हा ही शाळा सुरू होती. परंतु वर्ष २०१३ पासून ही शाळा बंद झाली. या शाळेची दुर्दशा पाहून माझ्या मनात वेदना झाल्या तेव्हाच मी निर्णय घेतला की ही शाळा कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही. नंतर ही शाळा वर्ष २०१८ पासून पुन्हा सुरू झाली. त्यावेळी या शाळेची पटसंख्या फक्त १७ इतकी होती. परंतु या शाळेचे मुख्याध्यापक व त्यांची शिक्षकांची चमूने अथक परिश्रम घेतल्याने आज घडीला या शाळेची पटसंख्या ३६५ एवढी आहे. या शाळेच्या दुरुस्ती, सोई, सुविधे व विकासाकरिता २५ लक्ष रुपयांची निधी मी जि.प.मधून मंजूर करून घेतली. या शाळेच्या सर्वांगीण विकासाकरिता ही शाळा आजपासून मी दत्तक घेत असल्याची घोषणा यावेळी, उषाताई शहारे यांनी केली. शिलाताई उईके यांनी ही मार्गदर्शन केले.
या वेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाळेतील सात विद्यार्थीचे जे नवोदय विद्यालय नवेगावबांध करिता पात्र ठरले अशा सर्व विध्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यध्यापक एम.के.सयाम यांनी तर संचालन व उपस्थितांचे आभार डी.व्ही.टेटे यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share