शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप संबंधात त्रास होता कामा नये,आमदार कोरोटे यांचे बँक अधिकऱ्यांना सूचना

■ देवरी येथील तहसील कार्यलयाच्या सभागृहात पीक कर्ज आढावा बैठक.

देवरी, ता.१२: देवरी तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाच्या मुद्दावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाच्या संबंधात त्यांना दिलेले टार्गेट पूर्ण केले आहे. पण जि आमची घरगुती व गावची बँक म्हणून परिचित असलेली को.ओपरेटिव्ह बँकेने आपले टार्गेट पूर्ण केलेले नाही. ते टार्गेट त्वरित पूर्ण करावे. नवीन सदस्यांना पीक कर्ज वाटप संबंधात जे नवीन जि.आर.आहे, त्यानुसार कर्म वाटप करावे. तसेच ग्रामीण भागातून शेतकरी हा कर्ज नसल्याच्या दाखला घेण्यासाठी देवरी येथील बँकेत येतो. त्यावेळी त्याला बँकेकडून दाखला देण्यात टाळाटाळ करून दिरंगाई केली जाते. त्यामुळे बँकांनी स्वतंत्र टेबल तैयार करून शेतकऱ्यांना कर्म नसल्याच्या दाखला कर्म आहे किंवा नाही या स्वरूपात द्यावे. अशाप्रकारचे नियोजन करावे. जेणे करून देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप संबंधात त्रास होता कामा नये. अशाप्रकारची सूचना या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी तालुक्यातील सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले.
अशी सूचना आमदार कोरोटे यांनी देवरी येथील तहसील कार्यलयाच्या सभागृहात सोमवारी(ता.११ जुलै) रोजी आयोजित शेतकरी पीक कर्ज वाटप आढावा बैठकीत दिले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार सहषराम कोरोटे हे होते. या प्रसंगी संस्था निबंधक श्री. कलीकर साहेब, तहसीलदार अनिल पवार, देवरीचे गटविकास अधिकारी श्री झामरे, तालुका कृषी अधिकारी जि.जि. तोडसाम, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संदीप भाटिया, माजी तालुकाध्यक्ष राधेश्याम बागडीया, पं.स.सदस्य प्रल्हाद सलामे, रणजित कासम, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवन सलामे, देवरीचे नगरसेविका सुनीताताई शाहू, नगरसेवक शकील कुरेशी, चिचगड आ.संस्थेचे अध्यक्ष भुवन नरवेरे, बोरगाव बाजार संस्थेचे अध्यक्ष वसंत पुराम, काँग्रेस पक्षाचे कुलदिप गुप्ता, छगणलाल मुंगणकर, अनित तरजूले, अरविंद उके, यांच्या सह को.ऑपरेटिव्ह बँक देवरी व चिचगड शाखा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा या सर्व बँक शाखेतील अधिकारी यांच्या सह आदिवासी सहकारी संस्थेचे सर्व अध्यक्ष, सचिव व संचालक गण आणि देवरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच परिसरातून आलेले शेतकरी बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
या बैठकीत आमदार कोरोटे हे पुढे म्हटले की, कृषी विभागाच्या संदर्भांत काही तक्रारी आहेत. यात २६० रुपयांची एक युरिया खताची बोरी ही ३५० रुपयात कृषी एजन्सीच्या माध्यमातून शेतक-यांना विकली जाते. अशा लुबाडण्याच्या प्रकार ज्या एजन्सी करीत असतील तर त्यां एजन्सीचा परवाना रद्द करण्याची कारवाई आणि जे कृषी सहाय्यक ग्रामीण भागात नियमित जात नाही, फक्त मुख्यालयात राहतात. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अशा तक्रारीच्या संबंधात तालुका कृषी अधिकारी यांनी कारवाई करावी अशी सूचना ही दिले.
या बैठकीचे प्रास्ताविक, संचालन व आभार देवरीचे तहसीलदार अनिल पवार यांनी मानले.

Print Friendly, PDF & Email
Share