जिप अध्यक्ष ‘एक्शन मोड’वर

गोंदिया: कार्यभार सांभाळताच पूर्ण एक्सन मोडमध्ये काम करणारे जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी जिल्हा परिषद इमारतीचे अचानक निरीक्षण केले. इमारत परिसरात असलेले सार्वजनिक प्रसाधनगृह, मुतारी, पायरी तसेच अंतिम माळ्यावर असलेल्या पाण्याची टाकी आदी स्थानी व्यक्तिगतरित्या जाऊन निरीक्षण केले. परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा व घाण पसरले असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी घाण, कचरा तातळीने स्वच्छ करण्याचे दिले निर्देश संबंधितांना दिले. मागील जवळपास दोन वर्ष जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त होते. त्यामुळे अनेक कामांवर अधिकार्‍यांचे लक्ष नसल्याबाबद तक्रारी लाभार्थ्यांकडून येत होते. यातच जिल्हा परिषद इमारतीकडे सातत्याने दुर्लक्ष असल्यामुळे सगळीकडे घाण व कचरा पसरलेले दिसून येत आहे.

मागील कित्येक वर्षांनी इमारतीचे फायर ऑडिट झालेले नसल्याचे अध्यक्षांच्या निदर्शात आले. इमारतीत फायर इंस्टिंग्यूसर लागले नसल्याने आग लगल्यास मोठा धोक्याची शक्यता, सीसीटीव्ही कॅमेराचा अभाव, कचराकुंड्याचा आभाव यासारख्या अनेक बाबी जिप अध्यक्षांना अचानक भेटीत आढळून आल्या. दरम्यान,जिल्हा परिषदेच्या इमारतीत स्वच्छतेसंबंधित दुर्लक्ष केल्याचे लक्षात आल्यावर अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी यावर नाराजगी व्यक्त केली. तसेच जिप मुख्याधिकारी व इतर अधिकार्‍यांना याविषयी तातळीने यावर काम करण्याचे निर्देशही दिले. सर्व अधिकार्‍यानी किमान आपल्या विभागांच्या बाहेरिल स्वच्छता संबंधित दक्षता घेतल्यास संपूर्ण इमारत स्वच्छ व सुंदर होईल असे मनोगत यावेळी अध्यक्ष रहांगडाले यांनी व्यक्त केले.

Print Friendly, PDF & Email
Share