सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतुन करा
भाजप पदाधिकाऱ्यांचे आ. परिणय फुकेंना निवेदन
गोंदिया: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर थेट जनतेतुन सरपंच, नगराध्यक्ष यांची निवड रद्द केली. आता राज्यात पुन्हा भाजपयुतीची सत्ता स्थापन झाली आहे. राज्यातील युतीच्या सरकारने सरपंच, नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतुन करण्याचा कायदा पुन्हा लागू करावा, या मागणीचे निवेदन विधान परिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांच्या मार्फत भाजपचे जेष्ठ नेते डॉ. गजानन डोंगरवार यांच्या नेतृत्वात देण्यात आले. गत काळात देवेंद्र फडणवीस मु‘यमंत्री असताना नगराध्यक्ष व सरपंच यांची निवड थेट जनतेमधून करण्याचा कायदा केला होता. त्यावेळी विरोधात असलेल्या काँग‘ेस व राष्ट्रवादी काँग‘सने या कायद्याला विरोध दर्शविला होता.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना, काँग‘ेस व राष्ट्रवादी काँग‘ेसची महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर नगराध्यक्ष व सरपंच यांची थेट जनतेमधून निवड करणारा कायदा रद्द करण्यात आला. सदस्यांमधूनच अध्यक्ष व सरपंच यांची निवड करणारा कायदा करण्यात आला. नगराध्यक्ष व सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्यासाठी तत्कालीन मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस आग‘ही होते. आता पुन्हा ते सत्तेत आले. त्यामुळे थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्षांची निवड करण्याचा कायदा करावा, अशी मागणी आ. डॉ. फुके यांच्या मार्फत शासनाला पाठविण्यात आलेल्या निवेदनाद्वारे भाजप पदाधिकार्यांनी केली आहे. सरपंच, नगराध्यक्ष थेट जनतेतुन निवडीचा शासन कायदा करेल, असे आश्वासन यावेळी डॉ. फुके यांनी दिले. निवेदन देतेवेळी भाजपचे जेष्ठ नेते डॉ. गजानन डोंगरवार, यादोराव मुंगमोडे, सदानंद गहाणे, संजय कुंभलकर, सहारे गुरूजी आदी उपस्थित होते.