पोलीस कर्मचाऱ्याच्या जिद्दीला सलाम, 151 कडुनिबांचे झाडे लावून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
◼️पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे लावणे गरजेचे: श्रीहरी कोरे
प्रहार टाईम्स
सडक अर्जुनी 03: मनेरी येथे पावसाळ्याच्या दिवसाचे औचित्य साधून पोलिस दलात नोकरी करून वृक्षलागवडीचे छंद जोपासणारे पोलिस कॉन्स्टेबल व मनेरी येथील रहिवाशी श्रीहरी नीलकंठ कोरे यांच्या मार्फतिने व गावकऱ्यांच्या मदतीने 151 कडुनिंबाच्या वृक्षाची लागवड गावातील रस्त्याच्या दुतर्फा करून वृक्षाची जनावरांपासून संरक्षणाकरिता वृक्षाच्या सभोवती हिरव्या नेटची जाळी लावण्यात आली. वृक्षाच्या संगोपनासाठी गावातील तरुण मुलांना व नागरिकांना दत्तक वृक्ष ( वृक्ष संवर्धन पालकत्व) देण्यात आले. पर्यावरण रासाचे परिणाम संपूर्ण जग अनुभवत असून त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे काळाची गरज झाली आहे असा संदेश या निमित्ताने देण्यात आला.
याप्रसंगी श्रीहरी कोरे यांनी स्वखर्चातून कडुनिंबाचे 151 वृक्ष व वृक्षाच्य संरक्षणासाठी लागणारी जाळी उपलब्ध करून दिली. व वृक्षलागवडीकरीता मनेरी येथील आनंदराव राऊत, नीलकंठ कोरे, राजू कोरे, सौ. पुस्पाबाई कोरे, भरत कोरे, यशवंत कोरे, सचिन फुडे, भाऊ ग्रुपचे आशुतोष कोरे, हर्षद कोरे, खेमराज कोरे, आशिष कोरे, विलास हुमे, सत्यपाल घरत, संदीप घरोटे, चेतन चुटे, रामेश्वर कोरे, हेमकृष्ण कोरे, निशांत कोरे, प्रदीप भेंडारकर, दिलीप भेंडारकर, प्रवीण हमे, बांबू व्यापारी भिमटेजी पळसगाव तसेच गावातील नागरिक हजर होते.