अवैध वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लाचेची केली मागणी, मंडळ निरीक्षक आणि वाहन चालक एसीबी च्या जाळ्यात

भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा कडून करण्यात आलेल्या कार्यवाहीत मंडळ निरीक्षक, भंडारा आणि वाहन चालक, तहसील कार्यालय, भंडारा यांना ताब्यात घेण्यात आले.

तक्रारदार पुरूष , वय 26 वर्षे, रा. ग्राम रोहा, तहसील मोहाडी आणि जिल्हा भंडारा याचा हार्डवेअर दुकानदार म्हणून व्यवसाय आहे.
आरोपी लोकसेवक क्रमांक : 1. श्री. अविनाश भानुदास राठोड, वय 44 वर्ष, वाहन चालक, तहसीलदार भंडारा कार्यालय. वर्ग 03 आणि क्रमांक 2. श्री. रामू बकाराम नेवारे, वय 56 वर्ष, पद मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, भंडारा यांनी संगनमत करून तक्रारदार याला आरोपी क्रमांक 01 याने 5000/- रुपये आणि आरोपी क्रमांक 02 यांनी 15000/- हजार रुपयांची मागणी करून मिळविण्याचा प्रयत्न केला.

तक्रारदार यांचे मालकीचे 02 ट्रक असून ते वाळूची वाहतूक करण्याकरिता वापरतात. दिनांक 07/06/2022 रोजी तहसीलदार, भंडारा आणि महसूल कर्मचारी यांनी तक्रारदार याचा एक अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडून कार्यवाही करून पोलीस स्टेशन वरठी येथे स्थानबद्ध केला होता.

आरोपी यांनी तक्रारदाराचे वाळू वाहतूक करणारे ट्रक वर तहसीलदार यांच्या मार्फत कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देऊन कार्यवाही न करण्याचे मोबदल्यात वर नमूद प्रमाणे मागणी केली आणि कार्यवाहीची धमकी देऊन ती मिळविण्याचा प्रयत्न केला. पडताळणी दरम्यान संभाषण रेकॉर्ड होत असल्याचे आरोपी क्रमांक 02 याचे लक्षात आल्याने लाच रक्कम स्वीकारण्याची शक्यता नसल्याने कलम 07 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही लोकसेवक आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कार्यवाही राकेश ओला , पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मधुकर गिते , अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर आणि महेश चाटे, पोलीस उप अधीक्षक, लाप्रवि, भंडारा यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कमलेश सोनटक्के, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. भंडारा करीत आहेत.

सापळा कारवाई पथक मध्ये श्री. कमलेश सोनटक्के, पोलीस निरीक्षक, अमित डहारे, पोलीस निरीक्षक स. फो. संजय कुरंजकर, ना.पो.शि. मिथुन चांदेवार, विष्णू वरठी, अंकुश गाढवे, कुणाल कडवं, राजकुमार लेंडे, विवेक रणदिवे, मपोशी अभिलाषा, चा.ना.पो.शि. दिनेश धार्मिक सर्व ला.प्र.वि. भंडारा यांनी सक्रिय भाग घेतला आहे.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो, भंडारा

दुरध्वनी 07184-252661, पोलिस उप अधीक्षक श्री. महेश चाटे
मो.क्र.- 9823408344, पोलिस निरीक्षक, कमलेश सोनटक्के
मो.क्र. 9422644538, श्री. अमित डहारे, पोलीस निरीक्षक, ला प्र वि भंडारा, 09823240129, टोल फ्रि क्रं. 1064

Share