गोंदिया जिल्ह्यात 315 गावांत दारुबंदीचा लढा

गोंदिया: दारुच्या बाटलीमुळे अनेक संसार उद्धस्त झालेत. अनेक संसार तुटण्याच्या मार्गावर असल्याचे पाहून जिल्ह्यातील महिला बचत गट व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने जिल्ह्यातील 241 गावात दारुबंदी झाली. तर 315 गावे दारुबंदीच्या मार्गावर आहेत.

दारुपायी अनेक घरे भंगली आहेत. गावातील ही विदारक परिस्थिती पाहून गावाचे चित्र पालटण्यासाठी महिला महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे गावातील महिलांना हाताशी घेऊन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी गावागावात दारुबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र काही राजकारणी व गुंडांनी त्याना दडपण्याचा प्रयत्न केला. तर काही ठिकाणी दारुबंदीसाठी पोलिस सहकार्य मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. असे असतानाही आतापर्यंत 241 गावांमध्ये दारुबंदी झाली आहेत, तर 315 गावे दारुबंदीच्या मार्गावर आहे. यासोबत बचत गटाच्या महिला व तंटामुक्त समितीने दारुबंदीसोबतच गावागावात चालणार्‍या सट्टा, जुगार व इतर अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share