१०वी च्या परीक्षेत सीता पब्लिक स्कुल देवरी चा 100 टक्के निकाल.

लीना मडावी ही ९५.८० टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम

देवरी 21: तालुक्यातील सीता पब्लिक स्कुल देवरी येथील विद्यार्थ्यांना १० वी बोर्ड च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेचे शंभर टक्के निकाल लागले आहे.शाळेची कु. लीना मडावी हिने ९५.८० टक्के गुण घेवून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
या परीक्षेत शाळेतून एकूण २१ विद्यार्थी बसले होते.यात २० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर १ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत. यमध्ये कु.लीना मडावी हिने ९५.८० टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली तर योगेश साखरे याने ८९.९० टक्के गुण घेत शाळेतून द्वितीय आणि रितेश ओडेलवार याने ८९ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष अनिल अग्रवाल, सुनील अग्रवाल, अंकित अग्रवाल, ब्रजेश सुलाखे, ओमचंद दसरिया यांच्या सह शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचाली करीता शुभेच्छा दिला.

Print Friendly, PDF & Email
Share