सुरतोली माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेत 100% निकाल

देवरी 21: एस.एस.सी.परीक्षा -2022 चानुकताच निकाल जाहीर झाला त्यांमध्ये तालुक्यातील सुरतोली माध्यमिक विद्यालय लोहारा 100 % निकाल लागला असून त्यामध्ये सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.

यामध्ये कु स्नेहल नंदलाल नाईक 84.80% घेऊन विद्यालयातून प्रथम , कु कृती गोपाले 84.60%, कु निशा वैद्य 80.80% गुण प्राप्त करून विद्यालयातून अव्वल आले. सदर परीक्षेत 46 विद्यार्थ्यांपैकी 46 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 9 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त , प्रथम श्रेणी मध्ये 24, द्वितीय श्रेणी मध्ये 13 विद्यार्थी आले.

उत्तीर्ण विद्याथ्यांचे शाळेचे मुख्याधापक सुभाष दुबे यांच्या शिक्षक पवार , नाईक , सोनाग्रे , शहनाझ मिर्झा . अलका दुबे यांनी अभिनंद केले.

Print Friendly, PDF & Email
Share