समर्थ विद्यालयात ऊर्जा क्लबची स्थापना

लाखनी १६:

स्थानिक लाखनी येथे समर्थ कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनानिमित्त वैभव कुमार पाथोडे प्रादेशिक संचालक महाऊर्जा नागपूर, संस्थाध्यक्ष आल्हाद लाखनीकर, रितेश तायडे जिल्हा व्यवस्थापक महाऊर्जा भंडारा प्रकल्प अधिकारी, दिनेश खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. दिनांक 14 डिसेंबर 23 डिसेंबर हा राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह समर्थ विद्यालय साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांना मध्ये जनजागृती आणि ऊर्जा संवर्धन या निमित्त प्रसार-प्रचार होण्या करिता ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विविध स्पर्धा घेण्यात येत आहे. यात वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा पोस्टर स्पर्धा घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून महाऊर्जा कार्यालयाकडून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह साजरा येत आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक किशोर आळे, प्राध्यापक विकास खेडीकर, उर्जा क्लब सचिव प्रदीप लिचडे, रूपचंद मखरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन आणि आभार गायत्री भुसारी यांनी केले.

Share