गोंदियाचे वैभव समजले जाणारे ‘सारस ‘ गणना १२ जून रोजी

गोंदिया 11: गोंदिया जिल्हा हा सारस पक्ष्यांचा वैभव आहे. सारस महोत्सवही जिल्ह्यात पार पडला. मात्र सारस पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन हे महत्वाचे ठरले आहे. त्यातच लगतचा भंडारा व मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात या पक्ष्यांचे वास्तव्य आहे. त्या अनुषंगाने ११ ते १२ जून रोजी दरम्यान या तिन्ही जिल्ह्यात सारस पक्ष्यांची गणना होणार असून १२ जून रोजी गोंदिया जिल्ह्यात गणना होणार आहे.

वन विभाग आणि सेवा संस्थेच्या वतीने गणनेचे अभियान राबविले जाणार आहे. ११ जून रोजी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात तर १२ जून रोजी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात गणना होईल. याशिवाय इतर आवश्यक ठिकाणी भेटी देऊन ही गणना केली जाणार आहे. गणनेत ६० ते ७० सारस मित्र, शेतकरी आणि सेवा संस्थेचे सदस्य, ४०-५० गोंदिया, बालाघाट येथील वनविभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. सेवा संस्था गोंदियाच्या मार्गदर्शनात ही गणना होणार असल्याची माहिती सावन बाहेकर यांनी दिली. दरवर्षी पूर्व विदर्भात अशा प्रकारची गणना केली जाते.

Print Friendly, PDF & Email
Share