आदिवासी भागात वन व्यवस्थापन समिती ची स्थापन करणे काळाची गरज: आमदार सहषराम कोरोटे

■ मुरकूडोह/दंडारी येथे आदिवासी समाजाच्या जंगल बचाओ मेळावा

देवरी, ता.०६: जंगल जगवा, जंगल वाचवा हा नारा आदिवासी समाजातील थोर पुरूषांनी दिला. या अनुसंघाणे आदिवासी समाजाने जंगल राखून ठेवला. परंतु यावेळी राखीव जंगलाची कटाई शासनाच्या माध्यमातून होत आहे. ते थांबविले पाहिजे. त्याचप्रमाणे ह्या आदिवासी भागात तेंदूपान संकलनाचे काम मोठ्या प्रमाणावर होते परंतु त्यांना सी.एफ.आर. मधील आदिवासी वन व्यवस्थापन समिती मार्फत तेंदूपान संकलनाचे दर ९४० रुपये प्रति शेकडा प्रमाणे देण्यात येते. मात्र ज्या ठिकाणी वन व्यवस्थापन समिती तर्फे तेंदूपान संकल करण्यात येत नाही. त्याठिकाणी ३०० रुपये प्रति शेकडा दराने रेट मिळत आहे. यामुळे आदिवासी समाजाच्या लोकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. ही एक शोकांकिता आहे तरी आदिवासी भागात ही वन व्यवस्थापन समितीची स्थापना करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.


आमदार कोरोटे हे आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यात येणाऱ्या मुरकूडोह/दंडारी या ठिकाणी आदिवासी समाजाचे जंगल बचाओ मेळाव्याचे आयोजन शनिवार(ता.४ जून) रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथीच्या रुपात मार्गदर्शन करतांनी बोलत होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कंगला माझी सरकार संस्था नई दिल्ली चे राष्ट्रीय अध्यक्ष फुलवा देवी कांगे हे होते. या प्रसंगी कंगला माझी सरकार चे राष्ट्रीय उपाध्यक्ष के.डी.कांगे, सालेकसा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वासुदेव चूटे, जि.प.सदस्य गीता लिल्हारे, पं.स.चे उपसभापती संतोष बोहरे, पं.स.सदस्य सुनीता राऊत, दर्रेकसा चे सरपंच ललिता पगरवार, नवीन उके, रमेश नेताम, टेकाटोलाचे पोलीस पाटील मलिक पंधरे, दिनेश राऊत, ओमप्रकाश लिल्हारे, हेमराज कुंजाम, अनिल मरकाम, गुणाराम मेहर, देवराज मरसकोल्हे, दिलीप उईके, चुंनीलाल राऊत, देवेन्द्र भोयर, ब्रीजंलाल नाईक, भारेलाल पंधरे, मोहन कुंभरे, फागूलाल कुंभरे व कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणी माझी किसान सैनिक यांच्या सह परिसरातील आदिवासी समाजातील महिला पुरुष व युवक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.


यावेळी आमदार कोरोटे पुढे म्हणाले की, हा भाग अतिदुर्गम अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त असल्याने या भागात शिक्षणाची सोय कमी आहे. या भागात शिक्षणाचे प्रमाण वाढले पाहिजे. या करिता मुरकूडोह/दंडारी या भागात बंद असलेली जि.प.शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना भेटून शाळा पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. या वरून या भागात शाळा सुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आदिवासी समाजातील माता-भगिनींनी महिला बचत गटाच्या माध्यमातून लाभ घेऊन आपला विकास साधावा असे बोलून या मेळाव्यात माझी संगठणेचे किमान सैनिक कार्यकर्ता आपल्या संस्थेच्या गणवेशात उपस्थित राहून समाजात जनजागृती व लोक कल्याणाचे काम करीत आहे. त्याबद्दल आमदार कोरोटे यांनी त्यांचे प्रशंसा करून आभार मानले.

Share