शालेय विद्यार्थ्याकरिता बसफेरी सुरु करण्यासाठी सविता पुराम यांचे आगार प्रमुखांना निवेदन
देवरी 06: देवरी तालुका हा आदीवासी व नक्षलग्रस्त, अतिदुर्गम भाग असल्यामुळे शालेय विद्यार्थी / विद्यार्थीनी यांचे शैक्षणिक कार्य सुरळीपणे व सुस्थीतीत चालण्याच्या दृष्टीकोणातुन तसेच प्रवासांची गैरसोय होवु नये म्हणुन या क्षेत्रात बस सेवा सुरु करण्यात यावी असे निवेदन सविता पुराम सभापती ,महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद, गोंदिया यांनी गोंदिया जिल्हा आगार प्रमुख यांना दिले आहे.
सदर निवेदनामार्फत शालेय विद्यार्थ्याकरिता बसफेरी सुरु करण्यात यावी जेणे करून त्यांचा शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्याअनुसंगाने देवरी तालुक्यातील ग्रामीण भागात प्रामुख्याने
◼️प्रवासाचा वेळ व मार्ग :- सकाळी ९.३० वाजता ( लोहारा सुरतोली चारभाटा सालेगांव टेकाबेदर – पिंडकेपार बोरगांव) या मार्गाने
◼️प्रवासाचा वेळ व मार्ग:- दुपारी ४.३० वाजता ( देवरी – बोरगांव – पिंडकेपार टेकाबेदर सालेगांव चारभाटा – सुरतोली – लोहारा) या मार्गाने बस सेवा सुरु करण्यात यावी. असे निवेदनात नमूद करून विनंती केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्धेशाने सविता पुराम प्रयत्नशील आहेत. नक्कीच आदिवासी ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांसाठी बस फेऱ्या सुरु करण्याचे सकारात्मक आश्वासन आगार प्रमुखांनी यावेळी दिले.