नेफडो शाखा देवरी तर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा

प्रहार टाईम्स
देवरी: नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा देवरी द्वारा देवरी शाखेचे अध्यक्षसचिन भांडारकर यांच्या मार्गदर्शनात तसेच शाखेचे कोषाध्यक्षइंजी.विक्की चौधरी यांच्या नेतृत्वात आज दिनांक ५ जून देवरी येथे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दीन साजरा करण्यात आला.
दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.
कार्यक्रमाला यशस्वी बनवण्या करीता नेफडो शाखा देवरी चे सदस्य पूजा यावलकर, प्रीती जांभूळकर, रक्षा रामटेके, खुशबू दसरिया यांनी अथक परिश्रम घेतले.

Print Friendly, PDF & Email
Share