मराठी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणार; ‘केआरए’ मुळे घडणार विद्यार्थ्यांचे भवितव्य
◼️उत्तम खेळाडू घडविणाऱ्यावर शालेय शिक्षणात दिला जाणार भर
गोंदिया 04: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या शिक्षणाकडे पालक गांभीर्याने लक्ष देत आहेत. आपल्या मुलांना खाजगी शाळेत पाठविण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. त्यामुळे शासकीय शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने गळती थांबविण्यासाठी शिक्षण विभागाने नवी पावले उचलली आहेत.
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने २०२२-२३ केआरए (की रिझल्ट एरिया) निश्चित केला आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली जाणार आहे. भविष्यातील उत्तम खेळाडूही घडविले जाणार आहेत. मात्र ही योजना राबविताना शिक्षकांचे अतिरिक्त काम वाढणार आहे. शिक्षकांचे काम वाढले तरी या निमित्ताने शाळेतून उत्तम खेळाडू व त्यांची गुणवत्ता वाढीस भर दिला जाणार आहे. या निर्णयामुळे पालक आपल्या पाल्यांसंदर्भात अजूनच बिनधास्त झाले आहेत.
खेळाडू घडविण्यावर भर: शाळेतील विद्यार्थी हे खेळातही पुढे यावेत यासाठी कलागुणांना वाव दिला जाणार आहे. म्हणूनच. फिटनेस कार्यक्रम, मुलांच्या विविध खेळातील प्रगतीसाठी त्यांना सुविधा या अंतर्गत निर्माण केल्या जाणार आहेत.
काय आहे केआरए:
◼️शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सन २०२२-२३ या कालावधीसाठी केआरए निश्चित केला आहे.
◼️या अंतर्गत राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करणे. दहावीपर्यंत मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करणे, विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा आहे. उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
◼️विद्यार्थ्यांची आधार नोंदणी करणे.
शिक्षकांनाही प्रशिक्षण, शाळांतील गळती रोखणार , त्यानुसार शिक्षकांना आपल्या शाळेत याची नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी लागेल. शाळेतील गळती थांबविण्यासाठी शाळेतील शिक्षण पद्धत काही प्रमाणात बदलून, मुलांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे, शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिलेल्या उद्दि- ष्टाबाबतचे प्रशिक्षण शाळेतील शिक्षकांना ऑनलाइन दिले जाणार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने शाळेतील गळती थांबवावी. चांगले खेळाडू तयार व्हावेत, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी केआरए प्रणाली निश्चित केली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश गोंदिया जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.