५० हजाराची लाच घेताना सरपंच व पोलीस पाटील जाळ्यात
भंडारा : खनिज खोदकामाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एका इसमाकडून ५० हजार रुपयाची लाच घेतांना सरपंच व पोलीस पाटील यांना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. दोघांवरही अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा तालुक्यातील नवरगाव येथील सरपंच रविंद्र कवडू आजबले (वय ४२) व पोलीस पाटील रामकृष्ण धर्माजी आजबले (वय ५३)
गिरोला पुनर्वसन येथील ४१ वर्षीय असे आरोपीचे नाव आहे. ही कारवाई एसीबीचे भंडारा उप अधिक्षक महेश चाटे यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
सविस्तर असे की, तक्रारदार यांची ग्राम नवरगाव शिवारात असलेली गौण खनिजची खान मौजा नवरगाव येथे आहे. खनिज खोदकाम करिता तक्रारदार याने जिल्हा खनिकर्म अधिकारी, भंडारा यांचे कडून ०१ वर्ष मुदतवाढ घेतल्या नंतर आरोपी यांनी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय खोदकाम व खडीकरण करता येणार नाही, अशी धमकी देऊन तक्रारदार याला ६० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. ती मिळविण्याचा प्रयत्न करून पाहिला हप्ता ५० हजार रुपये आरोपी क्रमांक सरपंच यांनी स्वीकारले. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
ही कारवाई विभागाचे नागपूर परीक्षेत्र अधिकारी राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक, भंडारा पोलीस उपअधिक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, अमित डहारे,
स. फो. संजय कुरजकर ना.पो.शि. अतुल मेश्राम, मिथुन चांदेवार, विष्णू वरठी, अंकुश गाढवे, कुणाल कडवं, राजकुमार लेंडे, विवेक रणदिवे यांनी केली