अवजड अवैद्य वाळूचे टिप्परमुळे देवरी नगरपंचायतीचे रस्ते फुटले – नगरसेवक सरबजितसिंग भाटिया

◼️ अवैद्य वाळूचे टिप्पर देवरी शहरातून वाहतूक केल्यास कारवाई करणार नगरसेवक सरबजीतसिंग भाटिया यांचा टिप्पर मालकांना इशारा

देवरी 03: नगर पंचायत देवरी अंतर्गत विविध वार्डात रस्ते व नाल्यांचे काम करण्यात आले परंतु टिप्पर चालकांच्या मनमानी मुळे देवरी शहरातील रस्त्यांचे हाल बिघडत चालले आहे. ही गोष्ट नवनियुक्त नगसेवक तथा गटनेता सरबजीत सिंग भाटिया यांच्या लक्षात येताच त्यांनी चक्क टिप्पक मालकांना नगरपंचायत देवरी च्या रस्त्यावर ओव्हरलोड अवैद्य वाळूचे टिप्पर चालविल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

देवरी शहरात प्रभाग क्र 7 अंतर्गत रस्ते टिप्पर मुळे खराब होत असल्यामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार टाईम्स ला दिली.

“मध्यरात्रीच्या वेळी अवैद्य वाळूचे टिप्पर देवरी शहरातून वाहतूक बंद करा , शहरातील रस्त्यावर खड्डे पडत असून त्याचा नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. पोलीस तक्रार करून संबंधित टिप्पर , चालक , मालक यांच्या वर कारवाई करण्यासाठी तक्रार करणार आहे. “

सरबजीतसिंग भाटिया , नगरसेवक देवरी
Share