नगर परिषद गोंदियाचे बाजार निरीक्षक व खाजगी इसम लाच स्विकारतांना अडकले एसीबीच्या जाळ्यात

प्रतिनिधी / गोंदिया : नगर परिषद कार्यालय, गोंदिया येथील मुकेश मिश्रा पद बाजार निरीक्षक, बाजार विभाग व खाजगी इसम नामे टिकाराम गुजोबा मेश्राम (सेवानिवृत्त चपराशी, नगर परिषद, गोंदिया) यांस ४० हजार रूपयांची लाच स्विकारल्याने ॲन्टी करप्शन ब्युरो, गोंदिया चे पथकाने कारवाई केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांना गंज बाजार, गोंदिया येथील नगर परिषदेच्या ” मालकीचे दुकान आधीचे दुकानचालक (तक्रारदाराचे मित्र) यांनी चालविण्यास देवून नगरपरिषद रेकॉर्डवर तकारदाराचे मुलाचे नावे नोंद करण्यात करिता नोटरी करून दिले होते. तक्रारदार सदरचे दुकान नगर परिषद रेकॉर्डवर तक्रारदाराचे मुलाचे नावे करण्याकरिता गेले आणि आलोसे मुकेश मिश्रा बाजार निरीक्षक, बाजार विभाग, नगर परिषद, गोंदिया यांना भेटले असता त्यांनी सदरचे काम करून देतो परंतु ते काम करण्याकरिता ३० हजार रूपये नगर परिषद मुख्याधिकारी गोदिया यांना देण्याकरिता व १० हजार रूपये माझेकरिता दयावे लागेल नंतर सदरचे दुकान तुमच्या मुलाचे नाव नगर परिषदेच्या रेकॉर्डवर नोंदविले जाईल असे सांगितले.परंतु तकारदाराला सदर आलोसे यांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने तक्रारदार यांनी मुकेश मिश्रा यांचे विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय गोंदिया येथे प्रत्यक्ष तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारी वरून २५ मे २०२२ रोजी आलोसे मुकेश मिश्रा यांची तक्रारदार कडे असलेल्या लाच मागणीचे पडताळणी करण्यात येवून आलोसे मुकेश मिश्रा यांनी ४० हजार रूपये खाजगी इमस टिकाराम गुजोबा मेश्राम (सेवानिवृत्त चपराशी) यांचेकडे देण्यास सांगितले. आलोसे विरूध्द बाजार विभाग, नगर परिषद कार्यालय, गोंदिया येथे सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले असता २६ मे २०२२ रोजी खाजगी इसम टिकाराम मेश्राम यांनी तक्रारदार यांचेकडून ४० हजार रूपये स्विकारल्याने टिकाराम मेश्राम यांस ॲन्टी करप्शन ब्युरो, गोंदियाचे पथकाने रंगेहाथ पकडून त्यांचेविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर, मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर पोलीस उप अधीक्षक पुरूषोत्तम अहेरकर, ला.प्र. वि. गोंदिया यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, सफ़ौ विजय खोब्रागडे, पोहवा संजय बोहरे, मिल्किराम पटले, नापोशि संतोष शेन्डे, राजेंन्द्र बिसेन, मंगेश काहालकर, संतोष बोपचे, चालक दिपक बतबर्वे सर्व नेमणुक ला.प्र. वि. गोंदिया यांनी केलेली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते, कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कोणी अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी ईसम लाचेची मागणी करीत असल्यास कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

Share