२० बैलगाड्यांवर निघणार देवराजची लग्नाची वरात
◼️कडीकसाच्या तरुणाद्वारे एक आदर्श घडविण्याचा प्रयत्न
देवरी◼️ सध्या इंधनाचे दर ज्या प्रमाणे वाढत आहे. या दरवाढीमुळे प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. आजच्या घडीला आधूनिकता आणि फॅशनच्या शर्यतीत प्रत्येकांना लग्न सोहळा करणे तारावरची कसरत वाटत आहे. अशा परिस्थितीत ही आदिवासी समाजातील तरुण पीढ़ी आदिवासी रीति रिवाजाच्या पलीकडे लग्नसारखे विधि करतात. देवरी तालुक्यातील कडीकसा येथील तरुणाने २० बैलगाडीच्या मदतीने ठरवून एक आदर्श घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
देवरी तालुक्यातील कडीकसा (गणुटोला) येथील आदिवासी तरुण देवराज भागीराम कुंभरे यांचा लग्न तालुक्यातील वांढरा येथील मनीराम कुंजाम यांची मुलगी टिकाबाली यांच्या सोबत येत्या २५ मे रोजा होणार आहे. या लग्न सोहळ्यात जाणारी वरात ही कार-बस ने नाही तर तब्बल २० बैलगाडी सोबत निघनार आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे, कारण या लग्न वरात ची मिरवणूक प्रस्थानाची जैय्यंत तैयारी सुरु आहे. वरं देवराज च्या बैलगाड़ी पासून ते ज्या बैलगाडीने वरात जाणार आहेत त्यालाही आकर्षक देखावा दिला जात आहे. यात सविस्तर असे कि रीतिरिवाज व संस्कृती प्रमाणे देवराज हा तरुण 25 मे रोजी टीकाबाली सोबत
आपल्या लग्नाची वराच नेण्याचे ज्या बैलगाड़ी मध्ये वराती बसणार की, आदिवासी रीती रिवाज व संस्कृती प्रमाणे देवराज हा तरुण करीता येत्या २५ मे रोजी टिकाबाली सोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाच्या वरात्यांची मिरवणूक ही कार-बस ने नाही तर बैलगाडीतून कडीकसा ते वांढरा या दहा कि.मी. अंतरा पर्यन्त निघणार आहे. या लग्नाच्या वरातींच्या मिरवणूकीत फक्त डी. जे. वर आदिवासी लोकगीत व लोकनृत्य सादर करणारे कलाकार सहभागी होणार आहेत. अशा प्रकारे बैलगाडीवर निघनारी लग्नाची वरातींची मिरवणूक तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रथमच पहाव्यास मिळणार आहे.
या लग्न सोहळ्यात पारंपरीक वेशात आदिवासी समाजातील लोक उपस्थित राहणार असून देवराज कुंभरे यांच्या अभिनव या उपक्रमामुळे तालुक्यातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण भागात यूथ आइकॉन ठरणार आहेत. लग्नाची तालुक्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे.