◼️मुलीच्या जन्माचे स्वागत आणि जन्मदरात वाढ करण्यासाठी नगरपंचायत देवरीचे 1 पाऊल पुढे
प्रा. डॉ. सुजित टेटे
देवरी 24: पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलांच्या जन्मावेळी उत्साह आणि मुलींच्या जन्मावेळी निराशा व्यक्त केली जाते. त्यामुळे कितीतरी नवजात मुलींचा जन्मापूर्वीच गर्भपात करून बळी घेतला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस मुलीच्या जन्मदरात घट होत असल्याचे चित्र आहे. यावर एक सामाजिक क्रांती घडविण्यासाठी नगरपंचायत देवरीचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सर्वानुमते ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात देवरी येथील नगरपंचायतीत केली आहे.
नगरपंचायत देवरी द्वारे मुलीच्या जन्माचे स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असून या उपक्रमातून मुलीच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे म्हणून मुलगी जन्मास आल्यानंतर प्रत्येकी 1 हजार रुपये ठेव स्वरूपात ठेवण्याचा निर्णय नगरपंचायतने घेतला आहे. यामुळे मुलींचा जन्म दरात वाढ होण्यास नक्कीच मदत होईल हे निश्चित.
समाजातील मुलीचे स्थान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात सर्वानुमते करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे समाजात निश्चितच जागरूकता निर्माण होणार आणि मुलीच्या जन्मदरात वाढ होण्यास मदत मिळेल.
अजय पाटणकर , मुख्याधिकारी देवरी









