देवरी: अपघातात कुटुंब गमावलेल्या ‘त्या’ शिक्षकाची सुद्धा प्राणज्योत मावळली
◼️देवरीच्या शिक्षकाचा कुटुंबासह भीषण अपघात, पत्नी व 2 मुले ठार
देवरी 25: 20 दिवसापूर्वी राष्ट्रीय महामार्गावर देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देऊळगाव येथे कार्यरत शिक्षकाचा कुटुंबासह डुग्गीपार जवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये तुळशीदास मेश्राम गंभीर जखमी झाले होते. त्या अपघातात पत्नी व 2 मुले यांचा मृत्यू झाला. चिन्मय तुळशीराम मेश्राम (वय 6 वर्ष), प्रीती तुळशीराम मेश्राम (वय 34 वर्ष) तर एक 12 वर्षाचा मुलाचा समावेश होता. वडील तुळशीराम रामा मेश्राम वय 45 यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मृत्युशी झुंज देत त्यांची सुद्धा प्राणज्योत मावळली असून अक्खा कुटुंब अपघातात उद्ध्वस्त झाला आहे.
5 मे रोजी भंडारा वरून परिवार सोबत येत असताना शसेकरण घाट येथे अपघातात पत्नी व 2 मुले जागीच ठार झाले. लाखांदूर तालुक्यातील मु.घरतोडा पो.सरांडी येथील मूळचे रहवासी होते. गरीब परिस्थितीमधून शिक्षण घेऊन प्राथमिक शिक्षक झाले होते शसेकरण घटपरीसरात हा दुर्दैवी अपघात झाला होता त्यात संपूर्ण कुटुंब उद्दवस्त झाले आहे.
यांच्या उपचारासाठी तालुक्यातील शिक्षक बांधवानी मदतीचा हात दिला होता सर्व स्तरावरून मदत मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते. त्यांचा उपचार नागपूर येथील खाजगी रुग्णालयात सुरु होता. सदर घटनेमुळे देवरी तालुक्यात शोककळा पसरली आहे.