जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पद सविता संजय पुराम यांच्या वर्णी
देवरी 23: गोंदिया जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतीपदासाठी आज 23 मे रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पद सविता संजय पुराम यांच्या वर्णी लागले असून त्याच्या निवडीबद्दल देवरी तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंद उत्साह दिसून येत आहे.
देवरी आमगाव मतदारसंघातून सविता पुराम आपल्या स्वगृह असलेल्या पुराडा मतदारसंघातून निवडणुक लढविली मात्र काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने आणि काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य न केल्यामुळे या जागेवर भाजपला लाभ होऊन सविता पुराम या पुराड़ा मतदारसंघातून सर्वाधिक मतानी निवडून आल्या.
◼️सभापती निवडणुकीत मतदारसंघ बदलून निवडून येणाऱ्या भाजपच्या शिलेदारांना भाजपने दाखवली पाठ
भारतीय जनता पक्षाने अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाला पुर्णत बाजुला सारल्याचे चित्र समोर आले आहे.वास्तविक तिरोडा-गोरेगाव व गोंदिया मतदारसंघानंतर याच मतदारसंघातून भाजपला सर्वाधिक जागा निवडणूकीत जिंकता आल्या.याउलट आमगाव-देवरी मतदारसंघात मोजक्या जागेवर समाधान मानावे लागलेले असताना शिलेदारांना पद न मिळाल्याच्या चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु झाली आहे.त्यातच सलग दोनवेळा वेगवेगळे मतदारसंघ बदलून निवडणुक जिंकून पक्षाची ताकद कायम ठेवणार्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचनाताई गहाणे व तिरोडा तालुक्यातील रजनीताई कुंभरे हे वास्तविक सभापतीपदासाठी प्रबळ दावेदार असताना त्यांना वगळण्यात आल्याने पक्षातील या भूमिकेबद्दलही नाराजी दिसून येत आहे.