तेंदूपत्ता लिलावाने वनविभागाच्या तिजोरीत हिरवळ

◼️रॉयल्टीतून मिळाला १२ कोटी रूपयांचा महसूल : २७ युनिटचा लिलाव

गोंदिया: जिल्हा वनसंपत्तीने परिपूर्ण आहे. ज्यामध्ये सर्वाधिक तेंदूपत्ताचे उत्पादन होते. 2022-23 या आर्थिक वर्षातील तेंदूपत्ता हंगामात वन विभागाच्या 28 तेंदूपत्ता युनिटपैकी 27 युनिटचे ई-लिलाव करण्यात आले असून या लिलावातून 11 कोटी 91 लाख 33 हजार 982 रुपये रॉयल्टी म्हणून वनविभागाच्या तिजोरीत जमा होणार आहे. दरम्यान या रॉयल्टीपैकी आतापर्यंत 60 टक्के रक्कम वनविभागाच्या तिजोरीत जमा झाली आहे.

विदर्भात सर्वाधिक जंगल परिसर असलेला जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. वनाच्या बाबतीत गडचिरोली जिल्ह्यानंतर गोंदिया जिल्ह्याचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात वन विभागाचे 56 वर्तुळ आहेत. त्यात 274 बीट तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये गोंदिया, गोरेगाव, सडक अर्जुनी, आमगाव, तिरोडा, अर्जुनी मोर, सालेकसा, दक्षिण देवरी व उत्तर देवरीसह गोठणगाव, नवेगावबांध, चिचगड असे 12 रेेंज आहेत. तर 2 लाख 54 हजार 288 हेक्टर क्षेत्रफळ वन क्षेत्रात असून असून पैकी 1 लाख 73 हजार हेक्टर क्षेत्रफळ वन विभागाच्या अख्त्यारीत येतो. जिल्ह्यात वन विभागातंर्गत 28 तेंदूपत्ता युनिट आहेत. त्यापैकी 28 युनिटचा ई-निविदाद्वारे लिलाव करण्यात आला आहे. या लिलाव प्रक्रियेतून गोंदिया वनविभागाला 11 कोटी 91 लाख 33 हजार 982 रुपयांची रॉयल्टी प्राप्त झाली आहे. त्यापैकी 60 टक्के रक्कम वनविभागाकडे जमा झाली आहे. तर उर्वरित 40 टक्के रक्कम तेंदूपत्ता संकलन हस्तांतरित करण्यापूर्वी प्राप्त होणार आहे. तेव्हा tendu auction तेंदूपानाच्या लिलावातून वनविभागाची तिजोरी आता भरणार आहे.

यापासूनही मिळते महसूल

गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील 30 टक्क्यांहून अधिक क्षेत्र tendu auction घनदाट जंगलाने वेढलेले असून येथील जंगलात तेंदूपत्ता, मोहफुल, हिरडा, बेहडा, डिंक, लाख या उत्पादनांच्या स्वरुपात मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होत असते. तर यातूनच विभागाला कोट्यावधी रुपयांचा महसुलही मिळतो. विशेष म्हणजे वनविभागाला तेंदूपत्ता विक्रीतून सर्वाधिक महसूल मिळतो. 

मजुरांना बोनसची आशा

सन 2020 मध्ये तेंदूपानाचे केवळ 15 युनिटचे लिलाव करता आले होते. त्यामुळे फक्त 3 कोटी 99 लाख 71 हजार रुपयांची रॉयल्टी प्राप्त झाली होती. परिणामी तेंदूपत्ता गोळा करणार्‍या मजुरांना अद्यापही बोनस देण्यात आलेला नाही. मात्र यंदाच्या हंगामात वन विभागाला तेंदूपत्ता लिलावातून कोट्यावधी रुपयांची रॉयल्टी मिळाल्याने तेंदूपत्ता संकलन करणार्‍या कामगारांना बोनस मिळण्याची आशा वाढली आहे.

Share