पोलीस हवालदार एसीबीची जाळ्यात, 1 लक्ष रुपयाची लाच भोवली

प्रहार टाईम्स वृत्तसंकलन
प्रतिनिधी / नागपूर : आरोपी लोकसेवक रामनाथ शंभुनाथ चौधरी, पोलीस हवालदार पोलीस स्टेशन वाठोडा यांनी तक्रारदार यांना त्यांचेकडे असलेल्या अर्ज चौकशीचे प्रकरणात तक्रारदार यांचेविरुद्धच्या अर्ज चौकशीचा निपटारा करण्याकरिता व सदर अर्ज चौकशी वरून गुन्हा दाखल न करण्याकरिता लाच रक्कम १,००,००० रूपयाची मागणी करून १,००,००० रूपये स्वतः स्विकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूरच्या पथकाने कारवाई केली.
सविस्तर वृत्त असे की, तक्रारदाराचे ग्राम पांढर्णा पहन ३३ खसरा नं. २१/१ मध्ये ०.६१ आर मध्ये श्री लॅन्ड डेव्हलपर्स या नावाने ले आउट असून सदर ले आउट संबंधाने त्यांचे विरूध्द पोस्टे वाठोडा येथे दाखल अर्जाची चौकशी आलोसे रामनाथ शंभुनाथ चौधरी, पोलीस हवालदार पोलीस स्टेशन वाठोडा यांचेकडे सुरू होती.सदर सुरू असलेल्या अर्ज चौकशी वरून तक्रारदार यांचे विरुध्द कोणताही गुन्हा दाखल न करण्याकरिता व अर्ज चौकशीचा निपटारा करण्याकरिता रूपये १,००,००० लाच रक्कमेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांची सदर कामाकरीता लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लोकसेवक रामनाथ शंभुनाथ चौधरी, पोलीस हवालदार पोलीस स्टेशन वाठोडा यांचे विरूध्द कायदेशिर कार्यवाही करण्याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथील कार्यालयाशी संपर्क साधला आणि तक्रार केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथील पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांनी तक्रारदार यांच्या तक्रारीप्रमाणे गोपनीयरित्या पडताळणी करून सापळा कारवाईचे आयोजन केले. आरोपी लोकसेवक कमांक रामनाथ शंभुनाथ चौधरी, पोलीस हवालदार पोलीस स्टेशन वाठोडा यांनी १,००,००० रूपये लाच रक्कमेची मागणी करून १,००,००० रूपये लाच रक्कम स्वतः स्विकारले वरून पोस्टे वाठोडा येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर, मधुकर गिते, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि., नागपूर पोनि सारंग मिराशे, पोहवा विकास सायरे पोहवा राम शास्त्रकार, नापोशी पंकज घोडके, चानापोशि अमाल भक्ते सर्व नेमणुक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी केली.
नागपूर परिक्षेत्र अंतर्गत सर्व नागरिकांना आव्हाहन करण्यात येते की, त्यांना कुठलेही शासकीय काम करण्याकरिता कोणताही शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांचे वतीने खाजगी इसम (एजंट) कायदेशिर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Share