देवरी येथे महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहात साजरी, जयघोषात निघाली देवरी ते पुराडा दुचाकी रॅली

देवरी 09: महाराणा प्रताप जयंती निमित्त देवरी येथे मोटार रॅलीचे आयोजन राष्ट्रीय राजपूत करणी सेने देवरीच्या वतीने करण्यात आले होते. सदर रॅली चे मार्ग धुकेश्वरी मंदिर देवरी पासून पुराडा गावापर्यंत होते. पुराडा येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला वंदन करून तालुक्यातील राजपूत समाजातील सर्व लोकांनी अभिवादन केले. यामध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेना तालुका अध्यक्ष राकेशसिंग पवार, प्रकाशसिंग परिहार , गणेशसिंग गहेरवार , कुमारसिंग सोमवंशी , बैस आदी समाजातील मान्यवर उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share