सिद्धार्थ हायस्कुल डवकी येथील विध्यार्थ्यांच्या शालेय परीक्षेचे निकाल घोषित

प्रहार टाईम्स

देवरी 09: कोरोना काळात शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा शैक्षणिक नुकसान झाला. हळूहळू शाळा पूर्वपदावर आले आणि शासनाच्या परिपत्रकानुसार शाळांनी परीक्षा घेतल्या. नुकताच देवरी तालुक्यातील सिद्धार्थ हायस्कुल डवकी येथील विध्यार्थ्यांच्या शालेय परीक्षेचे निकाल घोषित करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी निकाल मिळविण्यासाठी उत्सुकता दाखवीत शाळेत हजेरी लावली.

ग्रामीण भागातील शाळा , प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील शाळेविषयीचा जिव्हाळा काही निराळाच असतो अशीच प्रचिती सिद्धार्थ हायस्कुल डवकी येथील विध्यार्थ्यांच्या शालेय परीक्षेचे निकालाच्या दिवशी बघावयास मिळाली. यावेळी शाळेचे प्राचार्य महेंद्र मेश्राम यांनी निकालानंतरची विद्यार्थ्यांची जबाबदारी आणि परीक्षेतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षिका . शिक्षकत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share