ग्रामसेवक संघटना देवरी यांनी घेतली नवनिर्वाचित पंस देवरीचे सभापती आणि उपसभापती यांची भेट

◼️ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची केला उत्साहात स्वागत

देवरी 09: दीर्घ प्रतीक्षेनंतर पंचायत समिती देवरीवर भाजपचे अंबिका बंजार यांची सभापती पदावर आणि अनिल बिसेन यांची उपसभापती पदावर नियुक्ती झाली आणि पंचायत समितीवर भाजपनी आपला झेंडा रोवला.

याच औचित्यावर देवरी तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त सभापती आणि उपसभापतीची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. ग्रामसेवक आणि पंचायत समिती हे ग्राम विकासाची दोन चाके आहेत. गावांचा विकास , गावातील समस्या आणि जनहितार्थ योजना यांच्या सुनियोजनातून सार्थ ठरत असतात. निश्चितच या आर्थिक वर्षात ग्रामसेवक आणि पंचायतसमिती सभापती , उपसभापती व सदस्यामार्फत देवरी सारख्या नक्षल आदिवासी मागासलेल्या भागात शासनाच्या योजना शेवटच्या टोकापर्यंत पोहचणार अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

सदर प्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र राठोड ,सचिव विलास गोबाडे ,आशिष कावळे ,विवेक बिठुळे ,सचिन कुठे ,सुरेश वाघमारे ,पी एस देशमुख ,आर आर मेश्राम ,तुलसीदास वाघमारे ,नितेश खोटेले ,बंडू कैलूके ,सुनील शिवणकर , तारेश कुबडे , रवी अंबाडे ,अजय रामटेके आदी उपस्थित होते.

Share