अन्न व पुरवठा विभागाच्या तालुका निहाय शासकीय गोदामांतिल वार्षिक तपासणीला सुरवात
Gondia 09: राज्य शासनाच्या अन्न व पुरवठा विभागामार्फत चालविण्यात येण्याऱ्या सर्व शासकीय गोदमाची जिल्हात सध्या वार्षिक तपासणी सुरू झाली असून आज देवरी येथील शासकीय गोदामाची तपासणी करण्यात आली. यामध्ये शासकीय गोदामात साठवून ठेवलेल्या अन्न धान्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने घेण्यात आले तशेच सर्व रेकॉर्ड आणि कागदपत्रे तापासले जात असून अनेक ठिकाणी असलेल्या अन्नधान्याची तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. ही तपासणी जिल्ह्यातील आठही तालुक्यता होणार आहे.