गोंदिया जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता बसण्याचा मार्ग सुकर
◼️दोन्ही अपक्ष उमेदवारानी माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
गोंदिया 09: जिल्हापरिषदेत 10 मे ला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून 53 जागापैकी भाजपने 26 जागा जिंकल्या असून मॅजिक फिगर गाठण्यासाठी 1 सदस्यांची गरज असतांना आज अपक्ष उमेदवारी लढलेले पोर्णीमा ढेंगे, सोनू कुथे यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांची नागपूर निवासस्थानी आमदार विजयभाऊ रहांगडाले तिरोडा यांच्या सोबत सदिच्छा भेट घेतली . आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या दोन दिवसांपूर्वी गोंदिया पंचायत समिती प्रमाणे नवीन समीकरण निर्माण होणार असा अंदाज वाटत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, चाबी संघटन आणि दोन अपक्ष उमेदवार यांची सत्ता स्थापन होणार, आता अशी चर्चा निर्माण झाली असतांनाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या निवास स्थान वर दोन्ही अपक्ष जिल्हा परिषद सदस्यानी भेट घेतल्याची फोटो सोशल मिडिया वर वायरल होत असल्याने गोंदिया जिल्हात जिल्हा परिषद मध्ये भाजपची सत्ता प्रस्थापित होणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.