पीएम किसान पोर्टलवर e-KYC करण्यासाठी शेतकरी ग्राहक सेवा केंद्रावर, OTP मुळे वाढली डोकेदुखी

प्रहार टाईम्स

Deori 09 : केंद्र सरकारच्यापीएम किसान योजनेत सातत्याने बदल होत आहेत. योजनेत अनियमितता आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत मिळावी यासाठी सरकारचा प्रयत्न राहिलेला आहे. 1 जानेवारी रोजी या योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. यानंतरच्या म्हणजेच 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याकरिता 31 मार्च ही अखेरची मुदत होती. मात्र, स्थानिक पातळीवरच्या अडचणी आणि शेतकऱ्यांना पुरेसा वेळा मिळावा या उद्देशाने नियमात बदल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना e-KYC हे अनिवार्य राहणार आहे पण यासाठी आता 31 मे पर्यंतची मुदत असणार आहे. परंतु ओटीपी मुळे शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढलेली दिसते. कृषी विभागाच्या माहितीनुसार ही मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ तर मिळणार आहे पण योजनेत नियमितता आणण्यासाठी प्रशासनाकडूनही योग्य ती यंत्रणा राबवली जाणार आहे.

Print Friendly, PDF & Email
Share