देवरीच्या तरुणाची विष प्राशन करून आत्महत्या, कुटुंबासह परिसरात हळहळ

देवरी 08: दिवसेंदिवस अपघात आणि आत्महत्याच्या संख्येत वाढ होत असून नुकतीच देवरीच्या एका शिक्षकाचे संपूर्ण कुटुंब अपघातात दगावले ही घटना ताजी असतांना देवरीच्या एका तरुणाने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. प्राप्त माहिती नुसार मनीष शेषराव निर्वाण (25) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने रात्री विष प्राशन केले. प्रकृती खालावली असता त्याला देवरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे देवरी वरून गोंदियाच्या रुग्णालयात हलविले असता तिथे त्याचा मृत्यू झाला.

मनीषच्या आत्महत्यामुळे कुटुंबावर दुःखाचे डोंगर उभे राहिले असून कुटुंबात फक्त आई आणि एक बहीण आहे. 1 वर्षांपूर्वी वडीलही दगावले. याआत्महत्येचा कारण काय आहे हे वृत्त लिहीत पर्यंत कळू शकले नाही.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें