1 लाख 16 हजार बालकांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ

गोंदिया 05: कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या. मात्र, शाळांपर्यंत मध्यान्ह भोजन योजनेचे अन्नधान्य पोहोचले नव्हते. त्यामुळे मोठी आगपाखड करण्यात आली. आता जिल्ह्यातील प्रत्येक शाळेपर्यंत धान्य पोहोचवण्यात आले असून आजघडीला जिल्ह्यातील शाळांमध्ये दररोज 1 लाख 16 हजार बालक मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेत असून त्यांच्या पोटाला आधार मिळाला. विद्यार्थ्यांना पौष्टिक आणि सकस आहार मिळावा, या उद्देशाने शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात करण्यात आली. शहरी भागात या योजनेकडे विद्यार्थ्यांचा फासरा रस नसला तरी ग्रामीण भागात या योजनेचा लाभ विद्यार्थी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणुचे संक्रमण असल्यामुळे विद्यार्थ्यांना संक्रमणाची लागण होवू नये, याकरिता पोषण आहार योजना बंद करण्यात आला होता.

मध्यंतरी विद्यार्थ्यांना घरपोच धान्य दिले जात होते. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट ओसरली. त्यामुळे राज्य शासनाने शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला. मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता शिक्षकांनी देखील जोर लावला. सकाळी सात ते साडेअकरा या वेळेत शाळा भरविण्यात आल्या. मात्र रखरखता उन्हाळा त्यातही मध्यान्ह भोजन योजनेचा धान्य शाळेपर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे पालकांत कमालीची नाराजी होती. माध्यमांनी देखील या विषयावर शिक्षण विभागावर आगपाखड केली. त्याचा परिणाम म्हणजे तातडीने प्रशासकीय सूत्रे हलली. शाळेत धान्य पोहोचते करण्यात आले. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील शाळांमध्ये पोषण आहाराचे धान्य पोहोचवण्यात आले.

Share