जिल्हातील 46 ग्रामपंचायत पोटनिवडणुका 5 जूनला

गोंदिया 05:जिल्ह्यातील सदस्यपद रिक्त असलेल्या 46 ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार 13 मेपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून 5 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये विविध कारणांनी रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्यपदासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केला.

त्यानुसार जिल्ह्यातील 46 ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्यपदासाठी पोटनिवडणूक होऊ घातल्या आहे. यातंर्गत 13 ते 20 मेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु राहील. यासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 23 मे रोजी होईल. तर उमेदवारी अर्ज 25 मे रोजी दुपारी 3 वाजतापर्यंत मागे घेता येतील. त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर पोटनिवडणुकीसाठी 5 जून रोजी मतदान घेण्यात येणार असून 6 जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें