खाजगी कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय पेन्शन मेळावा संपन्न
गोंदिया 01: – महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन कर्मचारी संघटन खाजगी विभागाद्वारे आयोजित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, शिक्षक-शिक्षकेतर एनपीएस धारक कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्रातील पहीला जिल्हास्तरीय पेन्शन मेळाव्याचे आयोजन,खाजगी विभागाचे विभागीय अध्यक्ष प्रदीप राठोड यांचे अथक परिश्रमाने व तसेच राजेंद्र कडव, सचिन राठोड, मनीष बलभद्रे यांच्या सहकार्याने येथील द्वारका लॉन येथे संपन्न झाले.सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर,कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी,राज्य नेते शैलेन्द्र भदाने,राज्य प्रसिद्धी प्रमुख संदिप सोमवंशी विभागीय अध्यक्ष अनिल वाकडे,खाजगी विभागीय अध्यक्ष नागपूर प्रदिप राठोड,नितीन माकोडे,मंगेश धाईत,पुरुषोत्तम हटवार,भारत आगाव,विकास गणवीर,अनिल बत्ते,कार्याध्यक्ष खाजगी विभाग भालचंद्र धांडे,राज्य प्रमुख जयेश लिल्हारे,जिल्हाध्यक्ष सचिन इंगोले,जिल्हाध्यक्ष संतोष मडावी,कार्याध्यक्ष चंद्रपुर रविंद्र मते,खाजगी विभाग प्रमुख चंद्रपुर सतिश मेश्राम,प्रणवकुमार उलमाले आदीसह राज्य कार्यकारणी तसेच जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारीणीचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्रास पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी राज्याध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले,की खाजगी विभागाच्या एकजुटीला मी सलाम करतो, असेच आपण जर एकजूट होऊन पेन्शन साठी संघर्ष केला तर भविष्यात नक्कीच आपल्याला यश मिळेल.असे ते म्हणाले,या प्रसंगी खाजगी विभागाचे अध्यक्ष प्रदीप राठोड यांनी आपल्या भाषणातून मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, तसेच भविष्यात पेन्शन साठी जो लढेल व शासनाच्या दारी पेन्शनची मागणी करेल त्याच्याच पाठीशी खाजगी विभागाचे एनपीएस धारक उभे राहतील, तसेच याप्रसंगी कार्याध्यक्ष आशुतोष चौधरी म्हणाले,की राजस्थान छत्तीसगड च्या धर्तीवर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन सरकारला लागू करावीच लागेल यासाठी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी एकजुटीने येऊन संघर्ष करावा असे ते म्हणाले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समक्ष जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. यात विभागीय प्रसिद्धी प्रमुख म्हणून विनोदकुमार माने तर,जिल्हाप्रमुख संजय चौधरी, जि्ल्हा महिला आघाडी प्रमुख प्रा.भारती कावळे,गोंदिया तालुका प्रमुख समीर तिडके, गोंदिया तालुका महिला प्रमुख रंजना कांबळे,मो.अर्जु.तालुका प्रमुख विश्लेष मेश्राम,तालुका प्रमुख देवरी मुकेश टेंभरे आदीचीं नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.तद्वतच जी.एम.दुधबरई, प्रा.भारती कावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजेंद्र कडव यांनी तर कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन विनोदकुमार माने तर कार्यक्रमाचे आभार मनीष बलभद्रे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज कडव जिल्हाध्यक्ष गोंदिया सचिन राठोड सचिव प्रविण सरगर,मनिष बलभद्रे,सचिन धोपेकर, चंदु दुर्गे, मुकेश रहांगडाले,रोशन गराडे,भुमेश्वर कटरे,होमेंद्र कटरे,गेंदलाल दुधबरई, विजय वासनिक,समिर तिडके, आदींनी अथक परिश्रम घेतले.