देवरी येथे खरीप हंगाम पूर्व आढावा सभा
■ शासनाच्या कृषि योजनेचे प्रचार प्रसार करण्याचे आमदार कोरोटे यांनी दिले अधिकाऱ्यांना निर्देश
देवरी : येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात कृषी विभागाचे खरीप हंगाम पूर्व आढावा सभा या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेख़ाली शुक्रवार (ता.२२ एप्रिल) रोजी पार पडले.
या सभेत देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व कृषी योजनेचा लाभ मिळायला पाहिजे या उदेशाने कृषी विभागाच्या योजनेचे प्रचार -प्रसार व प्रसिद्धि चांगल्या प्रकारे करण्याचे निर्देश आमदार कोरोटे यांनी उपस्थिति कृषी अधिकाऱ्यांना दिले.
या प्रसंगी सभेत देवरी तालुका कांग्रेसचे माज़ी तालुकाध्यक्ष राधेश्याम बगड़िया ,देवरी चे उपविभागीय कृषी अधिकारी मंगेश वावधने,देवरी चे तहसीलदार अनिल पवार ,देवरी चे तालुका कृषी अधिकारी जि.जि .तोड़साम, देवरी चे नगर सेवक शकील कुरेशी यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषि सहाय्यक व इतर कर्मचारी बहुसंख्ने उपस्तिथित होते.