देवरी: लोहारा येथे दुचाकींची अमोरासमोर धडक चार गंभीर जखमी

देवरी /लोहारा 24: देवरी तालुक्यातील लोहारा बसस्टॉप चौकात 2 मोटारसायकलीची अमोरासमोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला असून यामध्ये 4 लोक गंभीर जखमी झाले. मोटार सायकल क्रमांक MH35AN 6928 आणि MH35AE 0275 यामध्ये जोरदार धडक झाली.

जखमींमध्ये राजेश मौजे (30), राजू मेश्राम (50)रा. पदमपूर देवरी, सोमेश्वर मेश्राम (27), लता बावणे (45) रा. डवकी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णवाहिकाने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Print Friendly, PDF & Email
Share