पगार बिल काढण्यासाठी पैसे मागणाऱ्या मुख्याध्यापकाला लाच घेताना केली अटक
Bhandara :- पगार बिल काढण्यासाठी शिक्षकाना लांच मागणे एका मुख्याध्यापकाला महागात पड़ले असून 1500 रूपयांची लांच स्विकारतांना मुख्याध्यापकाला भंडारा लाच लुचपत विभागाने अटक केली आहे. सदर ची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील उसर्रा येथे घडली असून उसर्रा येथील सोसायटी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे मुख्याध्यापक युवराज रामचंद्र कापगते वय 55 असे लाच स्वीकारणाऱ्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याच विद्यालयातील सहाय्यक शिक्षक यांनी भंडारा लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली कि सदर मुख्याध्यापक युवराज कापगते यांनी माहे एप्रिल महिन्याचे पगार काढण्यासाठी प्रत्येक शिक्षकांडून 1500 रुपयाचे मागणी केली असून पैसे दिल्याशिवाय पगार निघणार नाही असे सांगितले आहे. सदर शाळा ही शंभर टक्के अनुदानित असल्याने कुठेही पैसे देण्याची गरज नसल्याचे लक्षात येता तक्रारकर्ता सहाय्यक शिक्षक याने लाचलुचपत विभागात तक्रार दिली. लागलीच शहानिशा केल्यावर पथकाचे अधिकारी सोनटक्के यांनी सापडा रचून सदर मुख्याध्यापक यास लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. सदर आरोपी मुख्याध्यापक यांच्याविरूद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अन्तर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. शिक्षणा सारखे पवित्र कार्य करनाऱ्या ठिकाणी अशी कारवाई झाल्याने जिल्ह्यात चर्चेला उधान आले आहे.