10 वी पास उमेदवारांसाठी कर्मचारी निवड आयोगाची मेगाभरती; 3603 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा

मुंबई | कर्मचारी निवड आयोगाने (एसएससी) अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस) पदाच्या एकूण 3603 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे.

ऑनलाईन अर्जाची संपूर्ण माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल. कमिशनच्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन उमेदवार भरतीसंबंधित अधिक माहिती मिळवू शकतात. तसेच या SSC MTS भरती अंतर्गत महाराष्ट्रात ५०० च्या जवळपास जागा आहे. 

स्टाफ सिलेक्शन कमिशन 2022 अर्जाची लिंक 22 मार्च 2022 रोजी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत साइटवर सक्रिय करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ऑनलाइन अर्ज पूर्ण करावा लागेल. डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग खाते वापरून नोंदणी केल्यानंतर आवश्यक अर्ज शुल्क ऑनलाइन भरले जाईल. ऑनलाइन अर्ज 30 एप्रिल 2022 पर्यंत सबमिट करणे आवश्यक आहे.

Print Friendly, PDF & Email
Share