देवरी : डासांच्या वाढत्या प्रादुभावाने डेग्यूचा धोका
देवरी 22: शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू, मलेरिया या रोगांची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी डेंग्यूच्या प्रकोपामुळे शहरवासी हैराण झाले होते. मात्र त्यानंतर पालिके प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याने व शहर स्वच्छतेच्या ठोस उपायोजना झाल्या नसल्याने यंदाही उन्हाळ्यात डासांच्या वाढत्या प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत आहे.
शहरातील तुंबलेल्या नाल्या, ओसंडून वाहणार्या कचर्याकुंड्या, सार्वजनिक ठिकाणावरील कचर्याचे साम्राज्य आदी समस्या सोडविण्याचे थातूरमातूर प्रयत्न होत आहे. परिणामी शहरात अस्वच्छतेचे वातावरण असून नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो.
मागील वर्षी डासांचा प्रकोप वाढत्याने शहरवासी डेंग्यू रोगामुळे हैराण झाले होते. अनेकांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. तिच परिस्थिती यंदाही उद्भवण्याची भीती शहरवासीयांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे डेंग्यूचा उच्छाद वाढण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले. आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे परिसर स्वच्छतेसह धूर फवारणी करण्याची मागणी होत आहे.