जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती पदासाठी आरक्षण जाहीर

प्रहार टाईम्स

गोंदिया– जिल्ह्यातील आठ पंचायत समिती सभापती पदासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली असून तीन ठिकाणी सर्वसाधारण, तीन ठिकाणी सर्वसाधारण महिला, एका ठिकाणी अनुसूचित जाती व एका ठिकाणी अनुसूचित जमाती महिला सभापती असे आरक्षण जाहीर झाले आहे.

गोंदिया पंचायत समिती सभापती पद सर्वसाधारण, आमगाव सर्वसाधारण, सालेकसा अनुसूचित जाती, गोरेगाव सर्वसाधारण, तिरोडा सर्वसाधारण महिला, सडक अर्जुनी सर्वसाधारण महिला, देवरी सर्वसाधारण महिला व अर्जुनी मोरगाव अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असणार आहे.

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी सामान्य स्मिता बेलपत्रे,अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पंचायत समिती सभापती पदासाठीची ही सोडत ईश्वर चिठ्ठीद्वारे काढण्यात आली. उपजिल्हाधिकारी सामान्य स्मिता बेलपत्रे यांनी आरक्षणाबाबतची संपूर्ण प्रक्रिया उपस्थितांना समजावून सांगीतली. या बैठकीला उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नाचे व शंकेचे समाधान करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share