शंकरपुर येथे “शाळापूर्व तयारी मेळावा” साजरा..!
बालकांची व पालकांची दिसली शिक्षणाप्रती उत्सुकता..!
साकोली 19: गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून कोरोना सारख्या वैश्विक महामारी मुळे सर्वचं क्षेत्र डगमकले हे तर सर्वांनाच माहिती आहे; मग तो देशाचा आधार शिक्षण क्षेत्र का असो ना..! मात्र मग हे शिक्षण क्षेत्र सक्षम कसं करायचं ? विशेषतः उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये ? असा प्रश्न सर्वांच्याच डोक्यामध्ये आला असेल..!
वरील प्रकरण लक्षात घेता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा यांच्या आदेशानुसार, “प्रत्येक शहरी व खेडेभागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये, “शाळापूर्व तयारी मेळावा” तसेच “बालक पालक मेळावा” राबवा व पहिल्या वर्गात प्रवेश करणार्या विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करा” असे सांगण्यात आले.
याचं पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरपुर (केंद्र : पिंडकेपार) येथे विद्यार्थ्यांची, गावामध्ये घोषणाबाजी करत रॅली काढून, शाळेमध्ये नावनोंदणी व चाचणी कार्ड, शारिरीक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, भाषा विकास तसेच गणनपूर्व तयारी आणि मार्गदर्शक असे शिक्षक व स्वयंसेवकांचे गट तयार करून पहिल्या वर्गात प्रवेश करणार्या सर्व विद्यार्थ्यांची उजळणी घेऊन “शाळापूर्व तयारी मेळावा” साजरा करण्यात आला.
तसेच मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून उपस्थित तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांना निःशुल्क शिक्षणसेवा देणारे, स्वयंसेवक सचिन सोनवाने व स्वयंसेविका पुनम मडावी यांना मुख्याध्यापक श्री. कटरे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
वरील मेळावा कार्यक्रम प्रसंगी जि.प. प्राथ. शाळा शंकरपुर चे मुख्याध्यापक श्री. कटरे सर, सह. शिक्षक श्री. सयाम सर, अंगणवाडी सेविका सोनवाने मॅडम, स्वयंसेवक सचिन सोनवाने, स्वयंसेविका पुनम मडावी तसेच ग्रा.पं. सदस्या शोभाताई कोचे, महिला बचत गट अध्यक्षा रजनीताई कोचे व से.सो. अध्यक्ष रेखराम मडावी त्याचप्रमाणे बालकांचे पालक व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.