शाळा पूर्व तयारी मेळावा आदर्श शाळा सावली येथे थाटात साजरा

प्रहार टाईम्स
देवरी 18: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सावली येथे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
उदघाटन झुलनताई पंधरे सरपंच सावली यांचे हस्ते रामेश्वर पवार यांच्या अध्यक्षतेखाली ,द्वीप प्रज्वलक चंद्रसेन रहांगडाले पो.पा.
प्रमुख पाहुणे, राजेश्वरी ताई बिनजलेकर उपसरपंच
मेश्राम मॅडम व्य.प .स. देवरी, पंधरे जी ग्रामपंचायत सदस्य ,, सौ नाजुका ताई गौतम ग्रा.प. सदस्य. सौ छंनेश्वरीताई वैद्य व मरस्कोल्हेताई शा.व्य.स., मीनाताई राठोड बिंजलेकरकरताई व डोयेताई अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत सदस्य , शाळा व्य.सदस्य .,स्वयंसेवक सह विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्यात प्रास्ताविक मुख्याध्यापक दीपक कापसे यांनी सादर केले. आदर्श शाळेची वाटचाल मागील इयत्ता मध्ये इयत्ता पहिली चे विद्यार्थ्यांनी केलेल्या गुणवत्ता विकास. भावी काळातील होणारी शाळेची प्रगती याविषयी मार्गदर्शन केले. बुद्धिष्ट सोशल फाउंडेशन तर्फे कुमारी वंशिका चंद्रसेन रहांगडाले काव्यगायन स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल तीन हजार रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले. इयत्ता आठवीच्या निरोप समारंभ चे औचित्य साधून मागील सत्रात झालेल्या स्पर्धा चे बक्षीस वितरण करण्यात सर्व शिक्षक वृंदा कडून गोड जेवनाचे आयोजन करण्यात आले. शाळा प्रवेश 25 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.संचालन दीपक लांजेवार आभार तुषार कोवले यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुका तज्ञ मार्गदर्शक कु. वर्षा वालदे व ग्यानीराम चांदेवार , गुरव मॅडम यांनी सहकार्य केले.

Share