विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘हा’ नियम लागू होणार..!
राज्यातील विद्यार्थी-पालकांसाठी महत्वाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा विषय सातत्याने समोर येत आहे.. विद्यार्थ्यांच्या जिवाच्या मानाने त्यांच्या खांद्यावर दप्तराचे मोठे ओझे पाहायला मिळते.. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मणक्याचा त्रास सुरु झाल्याचेही समोर आले होते..
ही बाब समोर आल्यानंतर ठाकरे सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
ठाकरे सरकारचा निर्णय..
2022-23 या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या अभ्यासक्रमातील 4 विषयांचा अभ्यासक्रम एकाच पुस्तकात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे पुस्तक घ्यावे लागणार नाही. परिणामी, पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे कमी होणार आहे.
पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणारे चार विषय – इंग्रजी, मराठी, गणित आणि खेळा आणि शिका, हे प्रत्येक सत्रासाठी एका पाठ्यपुस्तकात एकत्रित केले गेले आहेत. विद्यार्थ्यांना सत्रानुसार भाग 1, 2, 3 किंवा 4 असे एकच पाठ्यपुस्तक बाळगावे लागेल.
राज्यातील सर्व शाळांमध्ये पुस्तकांबाबत हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. तसा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होणार असल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे..
दरम्यान, राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिलीसाठी हे एकात्मिक पुस्तकं असणार आहे, तर दुसरीसाठी 101 तालुक्यांत हे धोरण राबवले जाणार आहे. त्यानंतर हळुहळू पूर्ण राज्यात एकात्मिक पुस्तकं लागू होणार आहेत.
याबाबत ‘बालभारती’चे संचालक विवेक गोसावी म्हणाले, की “2022-23 मध्ये राज्यातील सर्व शाळांमधील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक आणले जाईल. त्यानंतर दुसरी व नंतर पुढील वर्गांसाठी अशाच प्रकारे धोरण राबवले जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू केल्यानंतर, त्यात आवश्यक ते बदलही केले जातील. एकात्मिक पाठ्यपुस्तक वापरणाऱ्या विद्यार्थी-शिक्षकांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे…”