खचून न जाता सतत प्रयत्न करत राहणे हा विद्यार्थी धर्म आहेपोलीस अधीक्षक वसंत जाधव
राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे आज 2020-21 गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आज 18 एप्रिल 2022 ला समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील भगिनी निवेदिता सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वसंत जाधव, पोलीस अधीक्षक, भंडारा आणि प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सुमंत देशपांडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी विद्यार्थी जयकृष्ण फेंडरकर, कार्यक्रमाचे संयोजक प्रा धनंजय गिऱ्हेपुंजे आणि पारितोषिक वितरण प्रमुख डॉ संगीत हाडगे प्रामुख्याने उपस्थित होते.
आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी वाटचाल केली पाहिजे. खचून न जाता सतत प्रयत्न करत राहणे हा विद्यार्थी धर्म आहे. यामुळे छोट्या छोट्या गोष्टी मिळवून आपले ध्येय गाठवे असे आपल्या प्रमुख भाषणातून पोलीस अधीक्षक वसंत जाधव कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
सतत प्रयत्न करा आणि तुमच्यातील गुणवत्ता ओळखा आणि त्यानुसार अधिकाधिक प्रयत्न करा यश तुमचेच आहे असे प्रमुख वक्ते प्रा. सुमंत देशपांडे याप्रसंगी बोलत होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे यांनी गुणवंत प्राप्त विद्यार्थ्यांच्या गौरव करीत पुढील वर्षी याहीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले पाहिजे यासाठी या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी कु. प्रणाली मते, शीतल गभणे, मोनिका गायधने, शील बागडे, प्रेरणा कान्हेकर, पर्नवी गायधने, पूजा मेश्राम, निकिता हटवार, सुरेश वलथरे, दामिनी मेश्राम, चेतना मते, विशाखा कुथे, आरती रणदिवे, दिव्या तितिरमारे, भरत काळसर्पे, आर्या सिंगणजुडे, आर्या वालोदे, भाग्यश्री नंदेश्वर, श्रेयस लांजेवार, दामिनी लांजेवार, चंद्रहास खंडारे, सीमा बोडणकर, वैष्णवी मेश्राम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आले तर अष्टपैलू विद्यार्थी म्हणून ज्ञानेश ढेंगे या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ सुरेश बन्सपाल, प्रा लालचंद मेश्राम, प्रा धनंजय गिऱ्हेपुंजे, लेफ्ट बालकृष्ण रामटेके, डॉ संगिता हाडगे, डॉ सुनंदा रामटेके, डॉ बंडू चौधरी, डॉ बी पर्वते, डॉ सचिन रहांगडाले, प्रा. प्रवीण पटले, रीना साठवणे, योगराज डोरलिकर, अशोक गायधनी, प्रशांत वंजारी, सुरेश केदार, मंगेश शिवरकर, प्रणय भांडारकर, श्याम पंचवटे, मोहन कावळे, दिनेश सलामे माजी प्राध्यापक, आजी माजी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा पद्मजा कुलकर्णी आणि आभार डॉ संगीता हाडगे यांनी मानले.