विधानसभा क्षेत्रातील सिंचन क्षमतेत आता नक्कीच वाढ होणार: आमदार सहसराम कोरोटे

■ या संदर्भात प्रस्तावित कामाना निधि उपलब्ध देण्याची मृदुसंधारण मंत्रयाकडे मागणी

देवरी, ता.१७:आमगांव देवरी विधानसभा क्षेत्रातील अर्धवट व नादुरुस्त असलेले उपसा सिंचन , लघु पाटबंधारे तलाव ,मामा तलाव ,साठवन बंधारे व कोल्हापुरी बंधारे जे अर्धवट व नादुरुस्त आहेत. अशा सिंचन क्षेत्राची काही कामे मंजूर झाले आहेत तर कामे प्रस्तावित आहेत .अशा प्रस्तावित कामाना निधी उपलब्ध करून दया या मागणीला धरूनया क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे हे राज्याचे मृदुसंधारण विभागाचे मंत्री शंकरराव गड़ाक यांना बुधवारी (ता.१३ एप्रिल )रोजी भेटून चर्चा केली आणि निवेदन सादर केले अशाप्रकारे सर्व सिंचनाची कामे लघुपाटबंधारे विभागा च्या माध्यमातून पूर्ण झाली तर आमगांव देवरी विधानसभा क्षेत्रातील सिंचन क्षमतेत नक्कीच वाढ होऊन या क्षेत्रात सिंचन क्रांति येणार असल्याची प्रतिक्रीया आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसिद्धि पत्रकाचा माध्यमातून व्यक्त केले.
प्रसिद्धि पत्रात आमदार कोरोटे यांनी म्हटले आहे की,आमगांव देवरी विधानसभा क्षेत्रातील अर्धवट व नादुरुस्त असलेले सिंचन कामामधे देवरी तालुक्यातील ककोडी येथील मामा तलाव दुरुस्ती करिता ७३ लक्ष ४ हजार रुपये तर आमगांव तालुक्यातील हलबीटोला/कोटरा येथील उपसा सिंचन दुरुस्ती करिता ४ कोटी १५ लक्ष रुपये आणि ठाणा येथील लघुपाटबंधारे तलाव दुरुस्ती करिता ३३ लक्ष २९ हजार व धनसुवा येथील लघुपाटबंधारे तलावाच्या दुरुस्ती करिता १७ लक्ष ३९ हजार रुपये तसेच सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथील उपसा सिंचन दुरुस्ती करिता ३ कोटी ६७ लक्ष व जमाकुडो करिता पुल व वन बंधारा दुरुस्ती करिता ९३ लक्ष ८० हजार रुपये अशा प्रकारे एकूण ९ कोटी ९९ लक्ष ५२ हजार रूपयाचे निधिची कामे मंजूर झाले असून यातील काही कामे निविदा प्रक्रीयेत तर काही कामे निविदा मंजुरीस महामंडळाकड़े सादर करण्यात आल्याची पत्रकात नमूद आहे.
त्याचप्रमाणे या मतदार संघामधे नवीन सिंचन कामाचे प्रस्ताव तैयार करण्यात आले असून यात देवरी तालुक्यातील पळसगांव/चुरिया येथील कोल्हारी बंधारा तर आमगांव तालुक्यातील कवळी येथील कोल्हापुरी बंधारा आणि सालेकसा तालुक्यातील नवटोला येथील कोल्हारी बंधारा व जमाकुडो येथे साठवन बंधारा तर बोदलबोडी येथील कोल्हारी बंधारा आणी,बिजली येथे कोल्हारी बंधारा ,नानवार येथे कोल्हारी बंधारा अशा अर्धवट व नादुरुस्त सिंचन कामाचे प्रस्ताव तैयार करण्यात आले असून या प्रस्तावित कामाना निधि उपलब्ध करुण घेण्यासाठी आमदार सहषराम कोरोटे यांनी राज्याचे मृदुसंधारण विभागाचे मंत्री शंकरराव गड़ाळ यांना मुंबई येथे भेटून चर्चा केली आणि निधीच्या मागणी संदर्भात निवेदन दिल्याचे पत्रात नमूद आहे.
अशाप्रकारे लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून आमगांव देवरी मतदार संघातिल सर्व सिंचनाची कामे पूर्ण झाल्यास या क्षेत्रातील सिंचन क्षमतेत नकीच वाढ होऊन या क्षेत्रात सिंचन क्रांति येणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सहषराम कोरोटे यांनी प्रसिद्धि पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

Share